ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

श्री.शिवराज मोरे यांच्या हस्ते सपत्नीक अंभ्रूणी धनलक्ष्मी मातेची प्राणप्रतिष्ठा संपन्न

अहिल्यानगर

सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही धनलक्ष्मी प्रतिष्ठाण, मंडई येथे शारदिय नवरात्रौ उत्सवाचे आयोजन केले आहे त्या निमित्ताने विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम पुढील नऊ दिवसात घेण्यात येणार आहेत.

सायं ६ वा ढोल-ताशांच्या गजरात धनलक्ष्मी मातेची प्राणप्रतिष्ठापना आणि अभिषेक महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष श्री.शिवराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली.

आपल्या प्रतिष्ठान ला विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच गरजूंना मदत स्वरुपात केलेली लक्ष्मीसेवा याला २१ वर्षांची परंपरा आहे, यंदा प्रतिष्ठान २२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे, आपण वर्षभर अनेक समाजोपयोगी उपक्रम घेतो.

यंदा आपण महिलांचे श्रीलक्ष्मी सूक्त पठन, नवदुर्गा सन्मान तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेत आहोत.

सदर कार्यक्रमास प्रतिष्ठानचे संस्थापक बाळासाहेब अमराळे, पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे , तुषार पठारे, अभिजीत चव्हाण, आनंद खन्ना, ऋषि सणस , सचिन चारोळी, स्वप्नील अमराळे, आशिष हिंगमिरे तसेच प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी युवक काँग्रेसचे शहरातील पदाधिकारी व प्रतिष्ठान चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे