ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सीना नदीला सलग दुसऱ्या दिवसी पूर, नगर कल्याण रस्त्यावरील वाहतूक बंद

अहिल्यानगर

रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी नगर शहरासह तालुक्याच्या विविध भागात झालेल्या पावसामुळे सीना नदीला पूर आला. या पुराचे पाणी नदीपत्रातून बाहेर येत अक्राळ रुप धारण केले.

दरम्यान, कल्याण रोडवरील पुलाचे काम सुरू असल्याने या ठिकाणी असणारा छोठा पुल पुराच्या पाण्याखाली गेल्याने सोमवारी दिवसभर कल्याण रोडवरील वाहतूक ठप्प होती. यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्‍या सर्व वाहनांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला.नगर शहरासह तालुक्यातील बहुतांश भागात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची कमी अधिक प्रमाणात संततधार सुरू आहे.

यामुळे सोमवारी सकाळी वाळकी, गुंडेगाव, देऊळगाव, खडकी, रुईछत्तीसी व परिसरात नद्या, ओढे, नाले ओसंडून वाहत असून शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. या अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरील शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र समोर आले आहे.

एकट्या गुंडेगावमध्ये 358 हेक्टर कांदा, 364 हेक्टर तुर, 150 हेक्टर कापूस, 27 हेक्टर सोयाबीन तसेच बाजरी, मका यांसारख्या पिकांवर पावसामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अशीच स्थिती बहुतांश गावांमध्ये आहे.शेतकर्‍यांनी हंगामभर खर्च करून घेतलेली पिके काही तासांच्या पावसामुळे पाण्याखाली गेल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी उपसरपंच संतोष भापकर यांनी तातडीने तहसीलदारांकडे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे. तसेच या संदर्भातील माहिती आ. विक्रमसिंह पाचपुते यांना देखील कळविण्यात आली आहे. यामुळे शासकीय यंत्रणेकडून गुंडेगाव परिसरातील शेती पिकांच्या नुकसानीसंदर्भात हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, लवकरच कृषी विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून प्राथमिक माहिती गोळा करणार असून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

शेतकरी वर्गाला शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकर्‍यांच्या हाती आलेला हंगामाचा घास पावसाने हिरावून घेतल्याने गावागावात हताशतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

नगर शहराजवळील सीना नदीला पूर आल्याने दिवसभर कल्याण रोडवरील वाहतूक ठप्प होती. दिवसभर या रस्त्यावर पूराचे पाणी असल्याने नागरिकांना काटवन खंडोबा, अरूणोदय गोशाळा या रस्त्याचा वापर करावा लागला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे