ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरात सावेडी परिसरात तरूणावर कोयत्याने हल्ला

अहिल्यानगर

जुन्या बोल्हेगाव रस्त्यावरून घरी जात असताना सावेडी परिसरातील एका तरूणावर तीन जणांनी कोयता, लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात दत्ता बबन वाघचौरे (वय 38, रा. आरोह कॉलनी, सावेडी) हे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाघचौरे यांनी दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (23 ऑगस्ट) रात्री 10.30 वाजता वाघचौरे हे दुचाकीवरून जुन्या बोल्हेगाव रस्त्याने जात असताना एकनाथ सोनवणे व त्याची दोन मुले यांनी त्यांना अडवले.

तू आम्हाला पाहून शिवी का दिलीस? असा जाब विचारून या तिघांनी वाघचौरे यांना मारहाण केली. वाद चिघळताच एकनाथ सोनवणे घरातून कोयता आणून वाघचौरे यांच्यावर वार केला. त्याच्या एका मुलाने लोखंडी रॉडने वार केले, तर दुसर्‍या मुलाने लाकडी दांडक्याने मारहाण केली. या हल्ल्यात वाघचौरे जखमी झाले असून घटनेनंतर उपस्थित नागरिकाने जखमी वाघचौरे यांना तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले.

या प्रकरणी वाघचौरे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात, एकनाथ सोनवणे व त्याची दोन मुले यांनी मारहाण केली असल्याचे नमूद केल्याने तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार रमेश शिंदे अधिक तपास करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे