ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या घरी चोरी..सोने चांदीचे दागिने लंपास

अहिल्यानगर

अहिल्यानगर लिंकरोड, केडगाव परिसरात शिरूर पोलीस स्टेशन, पुणे येथे कार्यरत असलेले संतोष बुधवंत (वय 38) यांच्या घरी चोरट्यांनी घरफोडी करत 62 हजार 500 रुपये किमंतीचे सोने आणि चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना 16 ऑगस्ट रोजी घडली.बुधवंत हे पुणे येथे पोलीस सेवेत असून ते 16 ऑगस्ट रोजी ड्युटीवर गेले होते.

त्याचवेळी त्यांची पत्नी अर्चना, आई मंदाबाई आणि मुले शिवांश व सुप्रिया रक्षाबंधनासाठी पाथर्डी येथील मूळ गावी गेले होते. 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी अर्चना घरी परतल्यावर त्यांना घराचे लॉक तुटलेले आणि सामान आस्ताव्यस्त पडलेले आढळले. त्यांनी तातडीने संतोष यांना फोनद्वारे कळवले आणि डायल 112 वर संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असता, बेडरूममधील कपाटाचे लॉकर तुटलेले आढळले.

चोरट्यांनी 20 ग्रॅमचे मंगळसूत्र, 5 ग्रॅमची अंगठी, 3 ग्रॅमची चैन, 2 ग्रॅमचे कानातले, चांदीच्या पाच अंगठ्या, दोन ब्रासलेट, चार जोडव्या, पायातील पैंजण आणि 16 हजार रुपये रोख लंपास केले.

बुधवंत यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील अधिक तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे