ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगरमध्ये देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश..तिघे जण पोलिसांच्या ताब्यात

अहिल्यानगर

कोतवाली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार बुरूडगाव रस्त्यावरील कृष्णा लॉजवर छापा टाकून तेथे चालू असलेला कुंटणखाना उघडकीस आणला. या कारवाईत तिघे जण ताब्यात घेतले असून एका महिलेची सुटका करण्यात आली आहे.

रविवारी (दि.17) सायंकाळी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कृष्णकुमार सेंदवाड, अंमलदार निता अडसरे, विशाल दळवी, विनोद बोरगे, विक्रम वाघमारे, संकेत धिवर, सचिन लोळगे, प्रतिभा नागरे यांचे पथक तयार करण्यात आले.

बातमीदाराच्या माहितीनुसार गणेश ससाणे (रा. ओम कॉलनी, नगर) हा महिलांकडून देहव्यापार करवून घेत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर छाप्याचे नियोजन करण्यात आले.

या कारवाईत पंचनामा करून एका अंमलदाराला बनावट ग्राहक म्हणून पाठविण्यात आले. त्यांनी लॉजमध्ये जाऊन ससाणे याला 500 रूपयांची नोट देत महिला मागवली. त्यानंतर ठरलेल्या इशार्‍याने पोलीस पथकाने पंचांसह कृष्णा लॉजमध्ये प्रवेश केला. लॉजच्या काऊंटरवर बसलेला इसम गणेश ससाणे असल्याचे स्पष्ट झाले. त्याने खोलीत महिला व ग्राहक असल्याचे कबूल केले. पोलिसांनी खोलीची पाहणी केली असता बनावट ग्राहक अंमलदार यांच्यासोबत पश्चिम बंगाल येथील महिला आढळून आली.

महिलेच्या चौकशीतून ससाणे याचा साथीदार कुमार शामलाल नारंग व महेंद्र शामलाल नारंग हे ग्राहकांना महिलांकडे पाठवण्याचे काम करीत असल्याचे उघड झाले.

पोलिसांनी गणेश ससाणे (वय 42, सारसनगर, नगर), कुमार नारंग (वय 40) व महेंद्र शामलाल नारंग (दोघे, रा. स्टेशन रस्ता, बेल्हेश्वर कॉलनी, आगरकर मळा, अहिल्यानगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे