श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने दत्त जयंती निमित्त गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप
अहमदनगर - प्रयत्न केल्यास मनुष्य आपली परिस्थिती बदलू शकतो - वृषभ कोठारी

जगात गरीब श्रीमंत असे कुणी नसते. फक्त प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि प्रयत्न केल्यास मनुष्य आपली परिस्थिती बदलू शकतो.
मुलांनी भविष्यात खूप प्रगती करावी आणि आपल्याला मोठे करण्यासाठी संघर्ष करणार्या आई-वडिलांच्या कार्याची जाणीव ठेवावी व त्यांना कधीही अंतर देऊ नये. शाळेपासून पाच-सहा कि.मी. पायपीट करत जाणार्या मुला-मुलींसाठी सायकल उपलब्ध करून देणे, हे महत्त्वाचे पाऊल म्हणायला हवे, शाळा घरापासून दूर आहे, यामुळे एकही मुलगा-मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठानचे जी तळमळ आहे, ती खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मंगल भक्त सेवा मंडळचे वृषभ कोठारी व्यक्त केले.
श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने श्री दत्त जयंती औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले याप्रसंगी श्री. कोठारी बोलत होते. यावेळी पवन फिरोदिया, बंडूभाऊ सप्रे, कीर्ती कुमार कोठारी, प्रा.अरविंद शिंदे , दिनेश साडीचे संचालक आदी मान्यवर उपस्थित होते
पुढे बोलताना कोठारी म्हणाले कि, श्री दत्त जयंती उत्सव म्हणजे आता या नगर शहराची एक ओळख बनली आहे. या उत्सवाच्या माध्यमातुन गरजू लोकांना मोठा लाभ होत आहे. धार्मिक उत्सव म्हंटल कि धार्मिक विधी, विविध पुजा-आर्चा, भजन, किर्तन या पलीकडे जाऊन प्रतिष्ठानच्या या कार्यक्रमांना सामाजिक उपक्रमांची जोड देऊ केल्यामुळे आज अनेकांना याचा लाभ होत आहे.
प्रास्तविकात प्रतिष्ठानचे श्रीनिवास इपलपेल्ली व योगेश ताटी म्हणाले की, श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठाच्या वतीने गेल्या 20 वर्षापासून दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येते आहे. या 21 व्या वर्षी दत्त जयंती उत्सवाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी म्हणून प्रतिष्ठानच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.
शिक्षण घेणार्या गरीब व गरजवंत विद्यार्थ्यांची अडचण ओळखुन प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी सायकल वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम राबवुन विद्यार्थ्यांना मदत केली जाते.
यावर्षी दत्त जयंती निमित्त 05 गरीब व गरजवंत विद्यार्थ्यांना नवीन सायकल देण्यात आल्या. तसेच दत्त जयंती निमित्त सामुदायिक विवाह सोहळा, पाखली मिरवणुक व महाप्रसादा (भंडारा) चे आयोजन करण्यात आले आहे, तरी जास्तीत जास्त भाविकांना या कार्यक्रमात सहभागी व्हावे, दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दीपक गुंडू यांनी केले. तर आभार अजय म्याना व चंदूकाका सब्बन यांनी केले. उपक्रम यशस्वीतेसाठी सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठान व निलाबंरी महिला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.





प्रतिक्रिया व्यक्त करा