ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

एक दिवस वंचितांसाठी अंतर्गत वंचित गरजू, वृद्ध दांपत्याची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळी फराळ वाटप 2024

अहमदनगर- पद्मशाली युवाशक्ती ( ट्रस्ट ), पद्मशाली महिला शक्ती , अहमदनगर यांचा उपक्रम

 ‘दिवाळी सण आहे मोठा, नाही आनंदाला तोटा’ या उक्तीप्रमाणे आंब्याची पाने, झेंडूची तोरणे, आकाशदिवे आणि आसमंत उजळून टाकणारे लक्ष लक्ष दीप, नवीन कपडचोपड खरेदी आणि सोबतीला लाडू, चकली, करंजी असा सुग्रास फराळ. असं असतांना आपण ज्या समाजात वावरतो तिथे काही कुटुंब असे आहेत की ज्यांच्या दोन वेळच्या जेवणाची ही भ्रांत आहे.

अश्यां वंचित गरजू, वृद्ध दांपत्याची, निराधारांची दिवाळी गोड करण्यासाठी संस्थेच्या वतीने दरवर्षी फराळाचे वाटप केले जाते, या वर्षी 103 कुटुंबा पर्यंत फराळाचे घरपोहोच वितरण करण्यात आले… असे अजय म्याना म्हणाले. ते पद्मशाली युवाशक्ती, पद्मशाली महिला शक्ती , अहमदनगर यांच्या वतीने राबवलेल्या एक दिवस वंचितासाठी’ उपक्रमांतर्गत करण्यात आलेल्या दिवाळी फराळ वाटप प्रसंगी बोलत होते.

रोजच्या गुजराणीचा प्रश्न असणाऱ्यांनी हा आनंदोत्सव, हा सण कसा साजरा करायचा हा एक जटिल प्रश्न असायचा ही बाब लक्षात घेऊन पद्मशाली युवाशक्तीने गेल्या 09 वर्षांपासून दर वर्षी दिवाळीच्या दिवशी वंचित गरजू, वृध्द दांपत्याना, निराधाराना घरी जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा आणि फराळ वाटपाचा हा उपक्रम हाती घेतला आहे…!! असे योगेश ताटी म्हणाले.

आपले घर लक्ष दिव्यांनी उजळून निघत असतांना शेजारच्या घरी अंधार ही भारतीय संस्कृतीला न शोभणारी गोष्ट, घासातील घास देण्याची संस्कृती आपली. सर्वांचीच दिवाळी गोड व्हावी, आनंदात जावी ही प्रामाणिक ईच्छा घेऊन 2016 पासून अहमदनगर शहरातील विविध भागात संघटनेतील युवकांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो…!!” असे सुमित इपलपेल्ली म्हणाले.

यावेळी दिपक गुंडू, सागर बोगा, सुमित इप्पलपेल्ली, श्रीनिवास इप्पलपेल्ली, योगेश म्याकल, योगेश ताटी, विराज म्याना, सागर मेह्सुनी, सागर आरकल, वैभव कंदी, शुभम बोल्ली, संजय चिप्पा, नरेश कुरापाटी, वैभव कोटा, विद्या एकलदेवी आदी उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे