ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर मध्ये ट्रॅक्टर, एसटी आणि इको कार एकमेकांवर आदळल्या, भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

अहमदनगर

नगर कल्याण महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात होऊन यात सहा जणांनी आपले प्राण गमावल्याची माहिती आहे. या घटनेने काहीकाळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

नगर कल्याण महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ठाणे – मेहकर एसटी बस आणि इको गाडी यांचा भीषण अपघात झाला.

ढवळपुरी फाट्या नजीक आज बुधवारी (२४ जानेवारी) पहाटे २.३० वाजता भीषण आपघात झाला असून यात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

यापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तर एकाचा अहमदनगर येथे उपचार चालू असताना मृत्यू झाला आहे. सहायक पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ आणि टीम घटना स्थळी दाखल झाली असून अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्यात आली.

सध्या आपघात ग्रस्त वाहनं रस्त्यावरुन बाजुला केली असून वाहतूक सुरळीत झाली आहे. दरम्यान, अपघात ग्रस्तांची ओळख पटविण्याचे काम चालू असल्याचे सांगण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये तिन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भयानक घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघातातील जखमींना प्राथामिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे