ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

शिवजन्म सोहळ्यानिमित्त रक्तदान तसेच पांडुरंगजी बलकवडे यांना शिवराज्य पुरस्कार

पुणे

शिवराज्य प्रतिष्ठान, छत्रपती श्री शिवाजी महाराज रोड, पुणे

तिथिनुसार माघ फाल्गुन शके १९४७ शुक्रवार दिनांक ६/३/२०२६ रोजी “छत्रपती श्री शिवाजी महाराज” जयंतीनिमित्त सालाबाद प्रमाणे या वर्षीही आपण रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शिवराज्य प्रतिष्ठान तर्फे प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू स्वरुपात मसाज गन चे वाटप करणार आहोत. 

तसेच आपल्या प्रतिष्ठान च्या २० व्या वर्षपूर्ती निमित्त यंदा आपण ज्येष्ठ इतिहास संशोधक मा. श्री. पांडुरंगजी बलकवडे यांना “शिवराज्य पुरस्कार” देऊन सन्मानित करणार आहोत तसेच “शौर्यगाथा इतिहासाची” या शिवकालीन प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करणार आहोत, तरी आपण सर्व शिवभक्तांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवावा.

कार्यक्रमाचे स्वरूप

– सकाळी ७ वाजता: छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे प्रतिमा पूजन 

– ⁠स ८ वा: रक्तदान शिबिर प्रारंभ 

– ⁠स १० वा: शौर्यगाथा इतिहासाची- शिवकालीन नाणी व शस्त्र प्रदर्शन 

– ⁠स ११ वा: शिवराज्य पुरस्कार वितरण 

– ⁠दु १२ वा: शिवजन्म सोहळा 

– ⁠दु १ वा: मान्यवरांचा सत्कार 

– ⁠सायं ७ वा: बालमेलावा आणि अल्पोपहार

शुक्रवार दि. ०६ मार्च २०२६

स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज रोड, मिसाळ चौक, पुणे..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे