ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नेवासा येथील फर्निचर च्या दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

अहिल्यानगर

नेवासा फाटा येथे रविवारी मध्यरात्री घडलेल्या एका भीषण आगीच्या घटनेने परिसर हादरला आहे. कालिका फर्निचर या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने स्थानिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

नेवासा फाटा कॉलेज परिसरातील कालिका फर्निचर दुकानाला रात्री 1 च्या सुमारास अचानक आग लागली. दुकानाच्या मागील बाजूस राहणाऱ्या मयूर रासने यांच्या कुटुंबाला या आगीने वेढले. आगीचा भडका इतका तीव्र होता की, कुटुंबीयांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.

या दुर्घटनेत मयूर अरुण रासने (वय 36), त्यांची पत्नी पायल (वय 30), त्यांचे दोन मुलं अंश (वय 11), चैतन्य (वय 6) आणि आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (वय 85) यांचा गुदमरून मृत्यू झाला. मयूर यांचे वडील अरुण रासने आणि त्यांच्या पत्नी मालेगाव येथे नातेवाइकांकडे गेले असल्याने बचावले.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे. दुकानातील लाकडी फर्निचर आणि ज्वलनशील पदार्थांमुळे आगीने रौद्ररूप धारण केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे