ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू

अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून सभासद संस्थांच्या (सेवा सोसायट्यांच्या) प्रतिनिधींचे ठराव 17 जून ते 16 जुलै या कालावधीत मागवण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक संभाजी निकम व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नगर मंगेश सुरवसे यांनी दिली.

या निवडणुकीत मतदान करण्यासाठी ज्या सहकारी संस्था 1 जून 2023 किंवा त्यापूर्वी बँकेच्या सभासद असतील त्याच पात्र राहणार आहेत. प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था सोडून इतर सहकारी संस्था थकबाकीत असतील, तर अशा संस्था प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार राहणार नाही. तथापि, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था जर थकबाकीत असेल, तर अशा संस्थांच्या संचालकांच्याऐवजी सदर संस्थेच्या थकबाकीदार नसलेल्या एखाद्या सदस्याचा प्रतिनिधी म्हणून समावेश करण्यात करण्याचा ठराव घेता येईल.

तसेच ज्या संस्थांच्या बाबतीत 73 क, अ (1), (ळ) फ अन्वये कार्यवाही केलेली असल्यास त्या संस्था मतदानासाठी पात्र राहणार नाहीत.

बँक सभासद संस्थांचे प्रतिनिधींचे ठराव संस्थेचे मुख्यालय असलेल्या जिल्ह्यातील संबंधित उप / सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत दिनांक 17 जून ते 16 जुलै 2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत सादर करावयाचे आहेत.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे