
सालाबादप्रमाणे याही वर्षी पदमशाली स्नेहिता संघम तर्फे तिळगुळ हल्दी कुंकू समारंभ मोठया थाटामाटात संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. नयना जगताप (स्त्रीरोग तज्ञ ) मा. सौ. ज्योति भोजणे (अध्यक्ष-वेलनेस क्लब) मा-श्रीलता आडेप (अध्यक्ष इनरव्हील क्लब ऑफ अहमनगर) हे उपस्थित होते.
स्नेहिता संघमच्या अध्यक्षा डॉ. रत्ना बल्लाळ यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या कार्याची माहिती दिली. मागील 23 वर्षापासून या मंडळाद्वारे समाजाला दिशा देण्याचे कार्य चालू आहे.
स्त्रीरोग डॉ. नयना जगताप यांनी घरातील महिला आनंदी निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ चांगले रहाते. महिलांनी इतर कामकाजासह स्वतःचे आरोग्य संभाळावे या शब्दात मार्गदर्शन केले.
सौ. ज्योति भोजणे यांनी आहार व प्राणायाम योगा याविषयी मार्गदर्शन केले.
श्रीलता आडेप यांनी ध्यान धारका विषयी प्रात्यक्षिक घेतले. आणि इनरव्हील तर्फ भव्य महिलांसाठी आरोग्य शिबीर घेण्याचा विचार मांडला.
सूत्र संचालन या प्रसंगी सी. ए. भक्ती संभार, सी. ए. दिया धावन – पेन्ली, जिज्ञासा छिंदम यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी कि भाजप ॲपची माहिती दिली. जिल्हा चिटनीस सविता कोटा यांनी नमो- ॲप कसे डाऊनलोड करायचे याची माहिती दिली.सूत्रसंचालन सरोजनी रच्चा, आभार आरती छिंदम यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष रेखा वड्डेपेल्ली, सचिव सपना छिंदम, सविता, एक्कलदेवी, पूनम वन्नम, सुवर्णा पुलगम, नीता बुरा, विजया धारा, कांचन कुंटला यांनी परिश्रम घेतले.
या प्रसंगी सर्व महिलांनी पारंपारिक नऊवारी साडी चा पेहराव परिधान केला होता.