बँकेतून पैसे कट झालेत, पण एटीएम मधून निघाले नाहीत तर काय करावे ? बँकेचे नियम सांगतात….
आजही अनेकजण कॅशने व्यवहार करतात आणि यासाठी एटीएम मधून पैसे काढतात. अनेकदा मात्र एटीएम मधून पैसे काढताना ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतो. काही वेळा बँकेतून पैसे कट होतात मात्र एटीएम मधून पैसे निघत नाहीत. अशावेळी एटीएम कार्डधारक हैराण होतात.

बँकेच्या ग्राहकांसाठी विशेषता एटीएम कार्ड धारकांसाठी आजची बातमी विशेष कामाची ठरणार आहे. अलीकडे पैशांचे व्यवहार मोठ्या प्रमाणात ऑनलाइन होत आहेत. पण, आजही अनेकजण कॅशने व्यवहार करतात आणि यासाठी एटीएम मधून पैसे काढतात. अनेकदा मात्र एटीएम मधून पैसे काढताना ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतो.
काही वेळा बँकेतून पैसे कट होतात मात्र एटीएम मधून पैसे निघत नाहीत. अशावेळी एटीएम कार्डधारक हैराण होतात. बँकेतून पैसे कट होऊनही एटीएममधून पैसे निघत नसल्याने ते गोंधळतात.
अशा परिस्थितीत आज आपण जर बँकेतून पैसे कट होऊनही एटीएम मधून पैसे निघाले नाहीत तर एटीएम कार्ड धारकांनी अशावेळी नेमके काय केले पाहिजे या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
एटीएम मधून पैसे काढताना जर बँकेमधून पैसे कट झालेत आणि एटीएम मशीन मधून पैसे आले नाहीत तर अशावेळी घाबरून जाऊ नका. सर्वप्रथम एटीएम मशीन चा नंबर आणि एटीएम मधून निघालेली स्लिप जपून ठेवा.
यानंतर तुमच्या बँकेच्या कस्टमर केअर सोबत संपर्क साधून त्यांना या व्यवहाराची माहिती द्या. याशिवाय तुम्ही तुमच्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन या संदर्भात माहिती देऊ शकतात अथवा तक्रार दाखल करू शकतात.
मात्र ही तक्रार दाखल करताना तुम्हाला एटीएम मशीन चा नंबर आणि ट्रांजेक्शनचा नंबर नोंदवावा लागणार आहे. तक्रार नोंदवल्यानंतर बँकेच्या माध्यमातून तुमच्या व्यवहाराची पडताळणी केली जाते आणि त्यानंतर मग तुमची तक्रार बरोबर असेल तर तुमच्या खात्यात पैसे वर्ग केले जातात.
आरबीआयचे नियम असे सांगतात की जर एटीएम मधील व्यवहार यशस्वी झाले असतील आणि तरीही तुमच्या बँकेमधून पैसे कट झाले असतील तर अशावेळी संबंधित बँकेला 5 दिवसांच्या आत पैसे परत करावे लागतात.
जर समजा बँकांनी तसे केले नाही तर त्यांना ग्राहकाला भरपाई सुद्धा द्यावी लागते. बँकेला दररोज 100 रुपये भरपाई द्यावी लागेल. ही भरपाई व्यवहाराच्या तारखेपासून पैसे परत जमा होईपर्यंत मोजली जाते.
जर तुम्ही बँकेकडे तक्रार दाखल करूनही तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही बँके अंतर्गत कार्यरत असणाऱ्या लोकपालाशी संपर्क साधू शकतात.
तुम्ही नोडल ऑफिसरकडे देखील या घटनेची तक्रार नोंदवू शकता. पण, जर एवढे करूनही तुमचे समाधान झाले नाही तर तुम्ही न्यायालयात मदत मागू शकता.