ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पाब्रेकिंगमहाराष्ट्र

वेगवेगळे क्राफ्ट बनवता बनवता माझा व्यवसाय सुरू झाला.- सौ. निकिता भाकरे

अहमदनगर प्रतिनिधी .

सौ.निकिता निंबाळकर – भाकरे.

 शिक्षण MSC काॅम्पुटर सायन्स.

राहणार – अहमदनगर..

साई क्राफ्ट आणि क्रिएशन 

मला लहानपणा पासूनच क्राफ्ट बनवण्याचा छंद आहे. वेगवेगळे क्राफ्ट बनवता बनवता माझा मी हा व्यवसाय सुरू केला. मी २०१८ मध्ये हा व्यवसाय सुरू केला. तेव्हा माझे लग्न नव्हते झाले एक छोटीशी सुरुवात होती. त्या वेळी मी माझ्या मनानी काही वस्तू बनवायची आणि मैत्रिणीं तसेच नातेवाईक यांना दाखवायची. काहींना आवडले की त्या माझ्या कडून खरेदी करायच्या. त्यामुळे माझ्या वस्तूंची माऊथ टु माऊथ पब्लिसिटी आपोआप होत गेली.

२०१९ मध्ये मला सोनई मध्ये पहिली ऑर्डर मिळाली. मोत्यांच्या रांगोळी ची. मग त्यानंतर मला गौरी गणपती डेकोरेशन साठी देखावा तयार करण्याची आयडिया सुचली. मग मी काही देखावे सादर केले.

उदा. – फुगडी खेळणारी महिला, तुळशी वृंदावन ची पूजा करताना,मंगळागौर खेळ खेळत असलेला देखावा आणि समोर कस्टमर ला पाहिजे ती थीम बनवून द्यायची.

नंतर माझे २०२० साली लग्न झाले. संसार, प्रेग्नंसी , आणि बाळ यामध्ये माझ्या या व्यवसायाला काही काळ खूप २ – ३ वर्षाचा गॅप पडला. आता परत मी माझ्या व्यवसायला सुरुवात केली आहे.

वेगवेगळ्या प्रकारच्या देखाव्याला मला कस्टमर कडून जास्त प्रतिसाद मिळत गेला. आणि आता वेगळे वेगळे थिम देखावे , गौरी गणपती, लग्न समारंभ, डोहाळे जेवण यासाठी खूप मागणी आहे.

अहमदनगर मधील इव्हेंट मॅनेजमेंट च्या मॅडम नी मला एक ऑर्डर दिली होती. थिम डोहाळे जेवण रुखवत होती. त्यात मी एक प्रेग्नंट लेडीज करून दाखवायचे होती. ती मी माझ्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन खुप छान बनवून दिली.. आणि त्या कस्टमर ला खुप आवडली.. त्या नंतर त्या प्रेगंट लेडीज मार्फत खुप ऑर्डर आल्या.. त्यामुळे मला खुप एक प्रेरणा मिळाली की आपण या क्षेत्रातच पुढे जायचे.काहीना वाटायचे की मी जॉब करावा , काहीजण म्हणायचे की शिक्षण चांगले झाले आहे जॉब कर हे काय करत बसली… नुसते कष्ट, मेहनत, कलाकारी, कल्पकता वगैरे वगैरे.. पण मी या कडे अजिबात लक्ष दिले नाही.. माझे मिस्टर माझे सपोर्टला होते.

माझे‌ साई क्राफ्ट आणि क्रिएशन या नावाने इन्स्टा, फेसबुक ला अकाऊंट आहे. त्या वर माझ्या या वस्तू अपलोड केल्याने त्यावरून मला काही ऑर्डर मिळाल्या. त्यात मोत्यांच्या रांगोळ्या, महिरप, तोरण, काही डेकोरेटीव्ह वस्तू बनवून दिले. त्यामुळे ऑनलाईन कस्टमरांनी खरेदी करून छान फिडबॅक दिले.

आता कस्टमर डिमांड नुसार माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या थिम चे सेट विक्री साठी ही आहे. आणि त्यासोबत च मी भाड्याने सुध्दा देते. आणि ऑर्डर साठी एक महिना आधी बुकिंग करावे लागते. कारण एक कस्टमर घरी जेव्हा वस्तू बघायला येतो तेव्हा माझ्या कडच्या वस्तू बघुन अजून २, ३ वस्तूंची ऑर्डर देऊन जातो. मी प्रदर्शन सुध्दा भरवत असते.

माझे स्वप्न आहे की स्वतः चे एक साई क्राफ्ट आणि क्रिएशन या नावाने दुकान असावे. आणि भविष्यात या क्राफ्ट संदर्भात क्लास ही घेणार आहे.

गौरी गणपती डेकोरेशन साठी ऑर्डर चालू झाल्या आहेत.. सर्वांनी एकदा अवश्य साई क्राफ्ट आणि क्रिएशन ला भेट द्यावी अशी विनंती करते..

अधिक माहिती साठी

साई क्राफ्ट आणि क्रिएशन

गुलमोहर रोड सावेडी अहमदनगर

९५२१९०२९०२

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे