ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगरमधील दर्गा पाडणाऱ्या दोन जणांसह जेसीबी चालकाला पोलिसांनी केली अटक

अहिल्यानगर

शहरातील आनंदीबाजार पटवर्धन चौकाजवळील देशपांडे हॉस्पिटल परिसरातील हिंदू-मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेला दर्गा अनोळखी लोकांनी जेसीबीच्या साह्याने पाडला. ही घटना रविवारी (दि. २४) रोजी पहाटे घडली.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, धार्मिकस्थळ पडल्याने शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी जेसीबी चालकासह दोघांना ताब्यात घेतले.

योगेश सखाराम झोंड (रा. बोरूडे मळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर, मूळ रा. धोंडेवाडी रोड, वाळकी, ता.जि. अहिल्यानगर), बबलू पाल (रा. बोरूडे मळा, बालिकाश्रम रोड, मूळ रा. उत्तर प्रदेश), जेसीबी मालक अरुण गोविंद खरात (रा. समता चौक, सावेडी, अहिल्यानगर अशी अटक केलेल्यांची नावे आहे. सचिन दारकुंडे (रा. समतानगर, सावेडी ता. जि. अहिल्यानगर), दत्ता गायकवाड (पूर्ण नाव माहीत नाही) व अन्य तीन अनोळखी व्यक्तींचा संशयित आरोपींमध्ये समावेश आहे.

याबाबत अॅड. वसीम राउफ खान (रा. देशपांडे हॉस्पिटलजवळ पटवर्धन चौक, आनंदीबाजार अहिल्यानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

रविवारी पहाटे साधारण तीन वाजता एक पिवळ्या रंगाच्या जेसीबी चालक व निळ्या रंगाच्या चेतक मोपेडवरून आलेल्या अनोखळी व्यक्तीने हिंदू-मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या दर्गाची तोडफोड करून जाणीवपूर्वक धार्मिकस्थळाचे नुकसान केले. तसेच, दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेंदवाड करीत आहेत.

घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक शिरीष वमने, एलसीबी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी आनंदी बाजार परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी जास्तीची कुमक मागवून परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणली. रविवारी दिवस परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

घटनेची गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने आरोपींचा शोध सुरू केला होता. तांत्रिक उपकरणांचा वापर करून गुन्ह्याची उकल केली. गुन्ह्यातील जेसीबीचा मालक अरुण खरात याला ताब्यात घेतले. जेसीबीची चौकशी केली असता बबलू पाल याला चालविण्यास दिल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर अन्य आरोपींची नावे समजली. पोलिसांनी योगेश झोंड, बबलू पाल, जेसीबी मालक अरुण गोविंद खरात या तिघांना तपासाकामी कोतवाली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, कोतवाली व तोफखाना पोलिसांनी केली.

कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आनंदीबाजार परिसरातील रस्ता लगत असणाऱ्या दर्गाची समाजकंटकांनी तोडफोड केली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्ह्यातील जेसीबी जप्त करण्यात आला.

पोलिस गुन्ह्याचा कसून तपास करीत असून, कायदेशीर कारवाई करीत आहेत. समाज बांधवांनी शांतता बाळगावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे