ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सहावीतील चिमुकलीवर ॲसिड हल्ला…

अहिल्यानगर

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान गावात सहावीमध्ये शिकणार्‍या बारा वर्षीय विद्यार्थिनीवर एका नराधमाने अ‍ॅसिड हल्ला केल्याची संतापजनक घटना मंगळवारी (दि.17) दुपारी घडली आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, विधानसभेतही ही घटना मांडल्यानंतर तत्काळ सरकारने गंभीर दखली घेतली आहे.

सदर विद्यार्थिनी सहावीत शिकत आहे. ती मंगळवारी शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात होती. त्याचवेळी रस्त्यामध्ये दबा धरुन बसलेल्या युवकाने तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला. त्यानंतर तो पळून गेला.

या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार सुरू आहे. तर आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे.

या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे. जलसंपदा तथा पालकमंत्री यांनी देखील ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर असल्याची प्रतिक्रिया देत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना विशेष पथक नेमून तपास करण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रवरा ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थिनीला सर्वतोपरी उपचार करण्याच्या सूचना देत शासनाच्यावतीने मदत मिळवून देण्याची ग्वाही देखील दिली आहे.

याचबरोबर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तीव्र निषेध करत पोलिसांनी गुन्हेगाराला अटक करावी आणि कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली.

तर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी लोणी येथे जाऊन मुलीची आस्थेवाईकपणे चौकशी करत पालकांना धीर दिला आणि संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.

दरम्यान, रणखांब येथे लग्नाला नकार दिल्याने तरुणीवर चाकू हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच ही संतापजनक घटना घडल्याने सर्वत्र निषेध होत असून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे