ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगरचा पारा १० अंशावर ..अहमदनगर मध्ये हुडहुडी वाढली..

अहमदनगर

जिल्ह्यात थंडीमध्ये मोठी वाढ झाली आहे. अहमदनगरसह नाशिक, पुणे येथे सर्वात कमी तापमान नोंदवले गेले आहे. पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नगरचा पारा ११ ते १२ अंशावर आला असून आणखी दोन दिवसात तो १० ते ९ अंशापर्यंत खाली येण्याची शयता हवामान विभागाने वर्वतली आहे.

नगरमधील वातावरण चांगलेच थंड झाले आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर नगरचा पारा १० ते ११ अंशावर आला होता. बुधवारी व गुरुवारीही सकाळपासून गार वारा सुरू आहे. बुधवारी नाशिक, पुणे, जळगावसह नगरचे तापमान सर्वात थंड होते. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्याने रब्बी पिकांना चांगला फायदा होत आहे.

जानेवारी महिन्यात पडलेल्या थंडीमुळे गहू, हरभर्‍याच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जानेवारी अखेरपर्यंत थंडीचा कडाका कायम राहील, असे म्हटले जात आहे.

बुधवारी नाशिक (९ अंश), अहमदनगर (९.३ अंश), पुणे (९.७ अंश), जळगाव (९.९ अंश), छत्रपती संभाजीनगर (१०.२ अंश) असे तापमान नोंदवले गेले. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर दिवसाच्या तापमानात हळूहळू वाढ होईल. १५ फेब्रुवारीनंतर रात्रीचा पारा १४ अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे