ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

महा विकास आघाडी कडून अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर

अहमदनगर

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात अखेर महाविकास आघाडीच्या वतीने माजी महापौर अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाशी एकनिष्ठ असलेले दादाभाऊ कळमकर यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा शरद पवार यांनी कळमकर परिवारावर विश्वास दाखवल्याचे चित्र आहे.

अभिषेक कळमकर हे अहमदनगर महापालिकेचे महापौर होते. कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला एक स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आता महाविकास आघाडीकडून रिंगणात उतरणार आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे हे देखील निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील होते ते देखील आता काय भूमिका घेतील ? याकडे नगरकरांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे