ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांचे निधन

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे (५६) यांचे आज बुधवार (दि.०४) रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक वर्गात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे…

सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवर अंबादास वाजे हे प्रभारी केंद्रप्रमुख या पदावर कार्यरत होते. काल रात्री १०.३० वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना सिन्नर येथील शिवाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पंरतु, मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. वाजे यांच्या रूपाने उत्तर महाराष्ट्राला पहिला महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा अध्यक्षपदाचा मान मिळाला होता.

शिक्षक, प्रशासन ,विद्यार्थी यांच्यातील समन्वयाद्वारे अंबादास वाजे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक गुणवत्ता वाढवत असताना आपल्या कार्यकुशलतेचा ठसा उमटवत प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे लक्ष साधत असताना त्यांनी पालकांबरोबर समन्वय साधण्याचे काम केले होते. ज्ञानगंगा ग्रामीण भागातील घरोघरी पोहोचवण्याचे काम वाजे यांच्या इच्छाशक्तीतून झाले होते. आदिवासी गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक योजना सुरू करून पालकत्वाची जबाबदारी वाजे यांनी स्वीकारली होती.

दरम्यान, शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वाजे यांची नेहमी धडपड असायची. नुकतेच सोमवारी त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर आज अचानक त्यांचे निधन झाले.

त्यांच्या जाण्याने सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात दुःखाचे सावट पसरले आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे