ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन,आमदार रोहित पवार यांना वेगळाच संशय..

अहिल्यानगर  जिल्ह्याच्या जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणाऱ्या कला केंद्रात नृत्यांगना म्हणून काम करणारी दिपाली पाटील हिने खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

या घटनेने शहरात खळबळ उडाली असून दीपाली पाटील ही मूळची कल्याण येथील रहिवाशी आहे. आपल्या काही मैत्रिणींसोबत ती सध्या जामखेडमधील तपनेश्वर भागात राहत होती. सकाळी बाजारात जाऊन येते असे सांगून ती बाहेर पडली. परंतु अनेक तास उलटूनही परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली. तसेच, दिपाली ज्या रिक्षाने गेली त्या चालकाकडून चौकशी केली असता, त्याने तिला साई लॉज येथे सोडल्याचे सांगितले. त्यामुळे, मैत्रिणी सायंकाळी लॉजमध्ये पोहोचल्या असता रुम आतून लॉक होती. लॉज कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता दिपालीने पंख्याला गळफास घेतल्याचे आढळले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात हलवला.

रोहित पवारांना वेगळाच संशय आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे,जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारी याबाबत कायमच आवाज उठवतोय परंतु या धंद्यांना कुणाचा आश्रय मिळतो हे आता लपून राहिलं नाही.

अशातच जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटील (३५) यांनी एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याची बातमी आली. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण होतं? त्याचे काय संबंध आहेत? त्याला कोणत्या उच्चपदस्थांचा वरदहस्त आहे? आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली? याची सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित लॉजवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन या गुन्ह्याची उकल करावी.

यातून अनेकांचे काळे चेहरे उघड झाल्याशिवाय राहणार नाहीत. संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा कुणी प्रयत्न केला तर तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे