ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

महानगरपालिकेच्या मालमत्ता करावरील शास्तीमध्ये जानेवारी अखेर १०० टक्के सवलत जाहीर

अहिल्यानगर - फेब्रुवारी अखेर शास्तीवर ७५ टक्के, २२ मार्च अखेर ५० टक्के सवलत मिळणार

महानगरपालिकेच्या सवलत योजनेचा लाभ घेऊन नागरिकांनी थकीत कराचा भरणा करावा : आयुक्त यशवंत डांगे 

महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यावर नियमानुसार शास्ती आकारली जात असल्याने नागरिकांच्या मालमत्ता करावरील थकबाकीचा बोजा वाढत आहे.

महानगरपालिकेवरही आर्थिक ताण वाढत असून महानगरपालिकेच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ८ जानेवारी ते ३१ जानेवारी अखेरपर्यंत मालमत्ताधारकांना शास्तीमध्ये १०० टक्के सवलत मिळणार आहे. तसेच १ ते २८ फेब्रुवारी अखेरपर्यंत ७५ टक्के, तर १ ते २२ मार्च अखेर ५० टक्के सवलत दिली जाणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.

महानगरपालिकेने कराच्या थकबाकी वसुलीसाठी जप्ती मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात येत आहेत. बहुतांश प्रकरणे लोक आदालतमध्ये घेऊन त्यात तडजोड करून मोठ्या प्रमाणात वसुली केलेली आहे. मागील तीन – चार वर्षात महानगरपालिकेने लोक अदालत च्या माध्यमातून सुमारे ३५ कोटी रुपयांची वसुली केली आहे. यंदा मार्च महिन्यामध्ये लोकअदालत होणार आहे.

मात्र, तत्पूर्वी थकबाकीदारांना संधी देण्याच्या दृष्टीने व महानगरपालिकेची जास्तीत जास्त वसुली होण्यासाठी शास्तीमध्ये तीन टप्प्यात सवलत जाहीर करण्यात आली आहे.

मालमत्ताधारकांनी त्यांच्याकडील थकीत मालमत्ता कराचा भरणा ३१ जानेवारी अखेर केल्यास त्यांना शास्तीमध्ये १०० टक्के सवलत मिळणार आहे. त्यानंतर २८ फेब्रुवारी अखेरपर्यंत कर भरणाऱ्याना शास्तीमध्ये ७५ टक्के व १ ते २२ मार्च अखेर कर भरणाऱ्यांना शास्तीमध्ये ५० टक्के सवलत मिळणार आहे.

थकबाकीदार मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व थकीत कराचा भरणा करावा. महानगरपालिका जप्ती कारवाई सुरू करणार असून कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी लवकरात लवकर कराचा भरणा करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे