
पुणे येथील पडमशाली समाजाचे कार्यकर्ते व ज्यांनी अलीकडे पडमशाली समाजातील विशेषत विडी काम करणाऱ्या महिला तसेच श्रमिक वर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या गोरगरीब वर्गातील कुटुंबाना घरे नसणाऱ्यांसाठी स्वतःच्या मालकीचे पक्की घर शासनाकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले श्री. महेश चलमल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम साजरा करण्यात आले.
पुणे महानगर पालिकेचे मामा सोनावणे हॉस्पिटल, गंज पेठ, येथील रुग्णांना सकाळी फळांचे वाटप करण्यात आले.
त्यावेळी सर्व श्री. प्रभाकर जिंदम, साईनाथ सापा,रमेश सा का, अहिल्यानगरचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. नारायणराव बोरा इत्यादी कर्यकर्ते उपस्थित होते.
जनसेवा फॉउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व आंबी येथील वृद्धाश्रम व कात्रज येथील अनाथ मुलांचे पुनर्वसनाचे आश्रम चालवीणारेआणि मानवतेच्या मार्गांवर जीवन व्यतीत करण्यासाठी प्रेरणादायी व गेल्या 55 वर्षा पेक्षा जास्त समाजसेवा करणारे पुण्यातील ज्येष्ठ समाज सेवक आदरणीय श्री. विनोदजी शहासर व सौ. मीनाताई शहा यांचे भेट घेऊन आशीर्वाद घेतले.




