ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

मळगंगा देवी मंदिरातून चांदीचे सिंहासन, सोन्याचे गंठण चोरीला..

अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील शेंडी (ता. अहिल्यानगर) गावातील मळगंगा देवी मंदिरातून चोरट्याने देवीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण आणि देवीच्या पाठीमागे बसविण्यात आलेले चांदीचे सिंहासन चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

या चोरीत एकूण 1 लाख 20 हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी (24 ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश अरूण कराळे (वय 31, रा. शेंडी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी प्रकाश कराळे हे शेंडी येथे कुटुंबासह राहत असून ते दररोज पहाटेच्या सुमारास शेंडी येथील मळगंगा देवी मंदिरात दर्शनासाठी जातात. मंदिरातील देवीच्या पाठीमागे चांदीचे सिंहासन बसविण्यात आले असून, देवीच्या गळ्यात सोन्याचे गंठण असल्याची त्यांना माहिती होती.

दरम्यान, रविवारी (23 ऑगस्ट) सायंकाळी सात वाजेपासून सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंतच्या कालावधीत चोरट्याने मंदिरातील सदर ऐवज लंपास केल्याचा संशय आहे.

सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कराळे हे नेहमीप्रमाणे दर्शनासाठी मंदिरात गेले असता त्यांना देवीच्या पाठीमागील चांदीचे सिंहासन तसेच देवीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण दिसून आले नाही. त्यानंतर त्यांनी त्यांचे मित्र महेश भगत यांना फोन करून मंदिरात बोलावले. दोघांनी मंदिराच्या परिसरात तसेच आजूबाजूला चोरीच्या ऐवजाबाबत चौकशी केली.

मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक व्यक्ती चोरी करत असल्याचे दिसून आले आहे. यानंतर पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली.

चोरीस गेलेल्या ऐवजात सुमारे 45 भार वजनाचे चांदीचे सिंहासन आणि एक तोळा वजनाचे सोन्याचे गळ्यातील गंठण, असा एकूण 1 लाख 20 हजार रूपयांचा ऐवज असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे