ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंग

अहिल्यानगर शहरातील सारसनगर परिसरातील तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार

शहरातील सारसनगर परिसरातील तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची घटना घडली.

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सारसनगर पुलाजवळ दारू पिण्याच्या वादातून सदरचा प्रकार घडला. जखमी गणेश नितीन गायकवाड (वय 26, रा. भगवानबाबा चौक, सारसनगर) यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

सारसनगर पुलाजवळ दि. 15 जानेवारी रोजी रात्री जखमी गणेश गायकवाड यांना मयूर छबुराव कांडेकर व त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी अडवले. ‌’तू दुसऱ्या धंद्यावर दारू पिण्यासाठी का जातो?‌’ असा जाब विचारत आरोपींनी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

आरोपींनी गणेश गायकवाड यांनाअर्वाच्य शिवीगाळ करत लाथाबुक्क्‌‍यांनी बेदम मारहाण केली. याच दरम्यान एका आरोपीने जवळ असलेल्या धारदार शस्त्राने त्यांच्या पाठीवर सपासप वार केले. झटापटीत त्याच्या खिशातील रोकडही गहाळ झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार धर्मनाथ पालवे करत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे