ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगरची एक्सप्रेस दिव्यांगी लांडे हिला सिनिअर राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत ब्राॅन्झ पदक

अहिल्यानगर मधील भुवनेश्वर, उडीसा या ठिकाणी सुरू असलेल्या ६५ व्या राष्ट्रीय सिनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेत नगरची एक्सप्रेस राष्ट्रीय खेळाडू दिव्यांगी लांडे हिने ४ बाय १०० मीटर रिले स्पर्धेत ४६.२१ सेंकदाची वेळ नोंदवत महाराष्ट्राला ब्राॅन्झ मेडल मिळवून दिले. महाराष्ट्राच्या रिले संघाने दमदार कामगिरी करत हे यश मिळवले.
या रिले संघामध्ये प्राजंली पाटील, दिव्यांगी लांडे, ऐष्वर्या मिश्रा, हरीता बद्रा यांचा समावेश होता. दिव्यांगी लांडे ही भुवनेश्वर, उडीसा सिनिअर गट राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वात कमी वयाची खेळाडू होती.

 

महाराष्ट्राची उत्कृष्ट धावपटू व अहिल्यानगरची एक्सप्रेस म्हणून दिव्यांगी लांडे ओळखली जाते. दिव्यांगीने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे.

हरियाणा, रोहतक येथे झालेल्या ६४ व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत रिलेमध्ये सुवर्णपदक, पंजाब येथे झालेल्या ६५ व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत १००, २०० मीटर स्पर्धेत ब्राॅन्झ पदक व बिहार, पटना येथ झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय षालेय स्पर्धेत १०० मीटर स्पर्धेत सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे. तसेच आसाम, गुवाहाटी येथे ३७ व्या ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत १०० मीटर व रिलेमध्ये सिल्व्हर मेडल मिळवले आहे. तसेच दिव्यांगी हिने अनेक राज्य, जिल्हा पातळीवर सुवर्णपदक मिळविलेले आहे. दिव्यांगी ही राष्ट्रीय कबड्डी खेळाडू कृष्णा लांडे यांची कन्या आहे. तसेच श्रीरामपूर येथील रा. ब. नारायणराव बोरावके महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. दिव्यांगीला शारीरिक शिक्षण संचालक डाॅ.विजय म्हस्के व क्रीडा शिक्षक संभाजी ढेरे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल दिव्यांगीचे नगर शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप, अर्जुन पुरस्कार विजेते पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, प्रा.शिशिकांत गाडे, प्राचार्य डाॅ.प्रविण बडदे, ॲथलेटिक्स असोसिएशन अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुनील जाधव, सचिव दिनेश भालेराव व सर्व मित्र परिवाराच्या वतीने दिव्यांगीचे अभिनंदन केले.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे