वंडर किड्स च्या चिमुकल्यांसोबत प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, राष्ट्रभक्तीपर कविता स्पर्धा व बक्षीस समारंभाने शाळेत रंगत..
अहिल्यानगर

वंडर किड्स सावेडी भागातील शाळेमध्ये 26 जानेवारी रोजी 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या विशेष दिनाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीतांवर नृत्य व गाणी सादर करून उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला.
कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणांमध्ये राष्ट्रभक्तीपर कविता म्हणण्याची स्पर्धा आणि बक्षीस समारंभाचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी आपल्या कवितांमधून देशभक्तीचे तसेच सामाजिक संदेश देणारे विचार मांडले. प्रत्येक स्पर्धकाने स्वतःच्या सृजनशीलतेने प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमात युकेजीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.. ज्याला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. या निरागस आणि ऊर्जावान सादरीकरणाने संपूर्ण वातावरणात आनंदाची लहर पसरवली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अविनाश जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच शाळेच्या फाउंडर सौ. वैशाली जाधव व मुख्याध्यापिका सौ. मोनिका दारवेकर तसेच सर्व शिक्षिका यांचे कार्यक्रमात विशेष योगदान होते. सौ मोनिका दारवेकर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देत, असे कार्यक्रम समाज घडविण्यासाठी कसे महत्त्वाचे ठरतात हे समजावून सांगितले.
शाळेच्या फाउंडर सौ वैशाली जाधव यांनी मुख्याध्यापीका, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे आभार मानले व अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, संघभावना आणि सृजनशीलता वृद्धिंगत होते असे सांगितले.
प्रजासत्ताक दिनाच्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा आणि देशभक्तीची भावना जागवली.