ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ, एकाचा मृत्यू, नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढणार?

पुणे

गेल्या काही दिवसांपासून जवळपास नामशेष झालेल्या करोना संसर्गाने राज्यात पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा किंचित वाढ नोंदवली गेली आहे. तसेच करोनाचा ओमायक्रॉन EG.5.1 हा नवा व्हेरिएंटही आढळून आला आहे.

देशात पहिल्यांदाच या व्हेरिएंटचा रुग्ण सापडला आहे. बी.जे. वैद्यकीय  महाविद्यालयातील वरिष्ठ संशोधक आणि महाराष्ट्राच्या जिनोम सिक्वेन्सिंगचे संयोजक डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात ओमायक्रॉन EG.5.1 व्हेरिएंट सापडला होता.

मात्र, त्यानंतर जून आणि जुलैमध्ये या व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या लक्षणीय नव्हती. गेल्या दोन महिन्यात राज्यात केवळ XBB.1.16 आणि XBB.2.3 व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत.

राज्य आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. जुलैच्या शेवटापर्यंत राज्यातील सक्रिय करोना रुग्णांची संख्या ७० इतकी होती. पण ६ ऑगस्टला नोंदवण्यात आलेल्या करोना रुग्णांची संख्या ११५ इतकी होती. तर सोमवारी नोंदवण्यात आलेल्या सक्रिय करोना रुग्णांची संख्या १०९ इतकी आहे.

रुग्णांची संख्या वाढण्यासाठी ओमायक्रॉन EG.5.1 व्हेरिएंट कारणीभूत ठरत असल्याचे समजते. यापूर्वी EG.5.1 व्हेरिएंटमुळे इंग्लंडमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या व्हेरिएंटमुळे इंग्लंडमधील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे