ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामतीत लोकसभेला सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीतून लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

सुनेत्रा पवार या बारामतीतून त्यांची नणंद आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खा.‌सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्याविरोधात कोणीतरी निवडणूक लढलंच पाहिजे हा माझा अर्थातच आग्रह राहील. लोकशाहीत भारतीय जनता पक्ष माझ्याविरोधात एक नाही तर तीन वेळा निवडणूक लढला आहे. त्याच्या गैर काय आहे? कोणीतरी लढलंच पाहिजे. जो कोणी लढेल त्याचं मी स्वागत करेन. कारण माझं संविधानावर प्रेम आहे. माझं राजकारण आणि समाजकारण हे संविधानाच्या चौकटीतलं आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचं पोस्टर लावण्यात काहीच गैर नाही. एखाद्या कार्यकर्त्याची तशी इच्छा असेल, म्हणून त्याने ते पोस्टर लावलं असेल. आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे