
सहसा अनेक विकासकामाच्या उद्घाटनाला मी जात नाही. मात्र जे काम कोणाकडूनही झाले नाही, ते काम पूर्ण केल्यानंतर त्या कामाच्या उद्घाटनासाठी आवर्जून जातो.
नागरिकांना त्रास होत असताना त्यांची दया येत नसेल, तर अशांमध्ये लोकप्रतिनिधी होण्याची पात्रता नसल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून उद्योजक सचिन (आबा) कोतकर व संदीपदादा युवा मंचच्या पाठपुराव्याने अनेक वर्षांपासून रखडलेल्या केडगाव येथील भैरवनाथ पतसंस्था ते पाच गोडाऊन पर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचा लोकार्पण गुरुवारी (दि.14 मार्च) रात्री पार पडला. यावेळी खासदार विखे बोलत होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोतकर, सुनील मामा कोतकर, संदीप दादा कोतकर युवा मंच अध्यक्ष भुषण गुंड, भरत ठुबे, गणेश सातपुते, नगरसेवक मनोज कोतकर, राहुल कांबळे, भरत ठुबे, युवराज कोतकर, धनंजय जामगावकर, माजी नगरसेविका सविता कराळे, सुनीता कराळे, सागर सातपुते, पंकज जहागीरदार, महेंद्र कांबळे, निलेश सातपुते, सुमित लोंढे, अशोक कराळे, गणेश नन्नवरे आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.