ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर मध्ये दरोडेखोरांनी पतीला दिला गळफास, अन् पत्नीसोबत…

अहमदनगरमध्ये एका सशस्त्र दरोड्यादरम्यान एका युवकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरोडेखोरांनी जवळपास सात लाखांचा ऐवज घेऊन पळ काढला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

अहमदनगरच्या  श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे-बेलापूर रस्त्यावर मध्यरात्री दरोडा पडल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दरोडेखोरांनी दरोडा टाकल्यानंतर एकाची ओढणीच्या सहाय्याने हत्या देखील केली आहे.

या सगळ्या प्रकारानंतर आरोपींनी घरातील ऐवज घेऊन पळ काढला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.

श्रीरामपूरच्या एकलहरे-बेलापूर रस्त्यावर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी घरात घुसून एका विवाहित युवकाची ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली आहे.

नईम पठाण असे 33 वर्षीय मयत युवकाचे नाव आहे. मयताची पत्नी रात्री लघुशंकेला घराबाहेर आली असता टक लावून बसलेल्या पाच दरोडेखोरांनी ही घटना घडवून आणली. दरोडेखोरांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. या दरोड्यात दरोडेखोरांनी सात लाख रुपये आणि सोने-चांदी असा ऐवज लांबवला आहे. श्रीरामपूर पोलीस पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

मयत नईम याची पत्नी लघुशंकेला बाहेर गेलेली दरोडेखोरांनी तिला फरफटत घरात आणून जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. आरडाओरडा होताच, दरोडेखोर घरात आल्याचे नईमच्या लक्षात आले. मात्र काही करायच्या आतच दरोडेखोरांनी नईमला घरातील लहान बाळांच्या झोक्यासाठी बांधलेल्या ओढणीने गळफास दिला. दरोडेखोरांनी ओढणीने नईमची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर शेती कामासाठी घरात आणलेली मोठी रक्कम घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळी धाव घेत दरोड्याच्या तपास सुरू केला.

पोलिसांनी काय सांगितले?

“श्रीरामपूर शहरातील एकलहरे गावामध्ये बुधवारी रात्री अन्वर चिराग शेख यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला होता. शेख यांच्या शेजारीच त्यांची मुलगी आणि जावई राहत होता. बुशरा यांनी रात्री फोन करुन वडिलांना सांगितले की आमच्याकडे चोर आले आहेत. फिर्यादींनी तिथे जाऊन पाहिले असता चोरट्यांनी बुशराच्या डोक्यावर बॅटरीने वार करण्यात आला होता. तसेच नईम पठाण मृतावस्थेत आढळून आले. नईम पठाणला साडीच्या सहाय्याने फाशी देण्यात आली होती.

चोरट्यांनी बुशरा आणि नईम पठाणला मारहाण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. आरोपींनी सात लाखांचा ऐवज घेऊन पळ काढला आहे,” अशी माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे