ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

रांगोळी, फुलांच्या पायघड्या, विद्युत रोषणाई अन् फुलांनी सजलेला रथ, अंबाबाईचा डोळे दिपवणारा रथोत्सव संपन्न

कोल्हापुरात अंबाबाईचा रथोत्सव सोहळा पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. फुलांनी सजलेल्या रथावर श्री करवीर निवासिनी अंबाबाई विराजमान होत्या. नयनरम्य आतिषबाजी, फुलांची उधळण करत सोहळा पार पडला.

अंबामाता की जय… चा गजर, रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या, भालदार, चोपदार, विद्युत रोषणाई फुलांनी सजलेला रथ असा शाही लवाजमा आणि त्यात विराजमान श्री करवीर निवासिनी अंबाबाईचीच्या उत्सवमूर्ती आणि रथावर होणार फुलांचा वर्षाव.

अशा मंगलमय वातावरणात बुधवारी रात्री अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळा पार पडला. जोतिबा चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी हा सोहळा पार पाडतो.

वर्षातून एकदा श्री अंबाबाई देवी नगरवासीयांची भेट घेण्यास बाहेर पडत असते. तर या शाही सोहळ्याला याची देही याची डोळा प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.

कोल्हापूरमध्ये नेहमीच विविध धार्मिक उत्सव होत असतात. मात्र या विविध उत्सवांत श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या रथोत्सवाचे विशेष महत्त्व आहे. कोल्हापुरातील या रथोत्सवास फार जुनी परंपरा असून दख्खनचा राजा जोतिबाची मुख्य चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी श्री अंबाबाईचा रथोत्सव सोहळा पार पडत असतो. त्यानुसार यंदा ही ज्योतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी श्री अंबाबाई मंदिरात रात्री साडेनऊ वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर ‘अंबा माता की जय’च्या जयघोषात रथोत्सवाला सुरुवात झाली.

सुंदर अशा पद्धतीने सजवलेले देवीचे रथ आणि रथापुढे मानाचा घोडा होता तर रथावर देवीचा चोपदार, हवालदार, मशाल आणि सुरक्षा रक्षक होते. परंपरागत वाद्यांच्या गजरात अंबाबाई मंदिरापासून रथोत्सवाला प्रारंभ झाला. प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणची पुष्पवृष्टी आणि नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात येत होती. तर आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथामध्ये श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी दिसत होती.

बँड पथके, ढोल ताशा पथके, चौऱ्या आणि मोर्चेल धरणारे सेवक, अशा लवाजम्यासह हा रथ नगरप्रदक्षिणेसाठी महाद्वार चौक, महाद्वार रोडमार्गे , गुजरी कॉर्नर येथे आला श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे महाद्वार चौक ते जोतिबा रोड चौक येथे विद्युत रोषणाई व भव्य आतषबाजी करण्यात आली. येथून रथ पुढे मार्गस्थ झाला आणि भवानी मंडपमार्गे तुळजाभवानी मंदिरासमोर आल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. दरम्यान रथोत्सवात ठिकठिकाणी पुष्पवृष्टीसह प्रसादवाटप, सरबतवाटपही सुरू होते. तर हा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण हजारो कोल्हापूरकर एकवटले होते. तर अनेकांनी आपल्या कॅमेरामध्ये हा सोहळा टिपण्याचा प्रयत्न केला.

असा असतो रथोत्सवाचा मार्ग

जोतिबा डोंगरावरील चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी श्री करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव पार पडत असतो. साडेनऊ वाजता तोफेच्या सलामीने देवीचा रथ मंदिरातून बाहेर पडतो. मंदिराभोवतीने प्रदक्षिणा घालत अंबाबाई देवीचा रथ महाद्वाररोड, गुजरी, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर चौक या मार्गावरून पुढे जात पुन्हा मंदिरात परत येत असतो. यावेळी या मार्गावर आकर्षक फुलांच्या रांगोळ्या काढलेल्या असतात.

तर काही ठिकाणी सामाजिक संदेश देणारे रांगोळ्या देखील मोठ्या प्रमाणात होते. तर लोक सभेसाठी ७ मे रोजी मतदान आहे. लोकशाही अधिक सदृढ होण्यासाठी मतदान करा, मतदानाचा हक्क बजवा, मतदार राजा जागा हो, लोकशाही धागा हो, आपला हक्क, आपला अधिकार, बनुया सुजाणन अन् जागरूक मतदार, माझे मत विकासाला असा रांगोळीत रेखाटलेला आशय लक्षवेधी ठरल्या.

मात्र यंदा अचानक आलेल्या पावसाने काही ठिकाणी रांगोळी वाहून गेली मात्र भक्तांकडून पुन्हा काही वेळातच नव्याने रांगोळी काढण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे