मेहकरात ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॅाप व प्रिंटर चे वाटप
अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

मेहकर दि ४ मेहकर तहसील प्रशासकीय ईमारत येथे आज आमदार सिध्दार्थ खरात यांच्या हस्ते ७० कर्मचाऱ्यांना लॅपटॉप व प्रिंटर वाटप झाले..
केंद्र आणि राज्य शासनाने प्रशासकीय कामकाजात गती आणण्यासाठी ई-गव्हर्नन्स उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आले आहेत. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यामधील एकूण १३ तालुक्यातील कार्यरत ५०४ महसूल अधिकारी व ८९ मंडळ अधिकारी असे एकूण ५९३ जणांना लॅपटॉप व ५९३ प्रिंटर शासनाने उपलब्ध करून दिले असून आज मेहकर तहसिल प्रशासकीय इमारत खंडाळा येथे मेहकर तालुक्यातील 10 मंडळ अधिकारी व 60 ग्राम महसूल अधिकारी यांना आमदार सिद्धार्थ खरात यांचे हस्ते लॅपटॉप व प्रिंटर वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तहसीलदार निलेश मडके , अजय पिंपरकर (नायब तहसीलदार), विदर्भ पटवारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजेंद्र धोंडगे, उबाठा गटाचे शहर अध्यक्ष किशोर गारोळे,युवा सेनेचे तालुका अधिकारी आकाश घोडे,अँड संदीप गवई ,रा.काँ.तालुका अध्यक्ष दत्ता पाटील घनवट ,तालुका पटवारी कार्यकारणी मेहकर व सर्व मंडळ अधिकारी तालुका मेहकर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन गणेश बाजड, यांनी केले व कार्यक्रमाचे नियोजन ग्राम महसूल अधिकारी राजू निकस यांनी केले.
ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत डिजिटल इंडिया लॅंड रेकॅार्ड मॅाडर्नायझेशन प्रोग्रॅम अंतर्गत जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे व जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे मान्यतेने साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.