ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगसंपादकीय

महाराष्ट्र राज्य आयोजित डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल च्या मुख्य संपादिका सौ.श्रुती बत्तीन मॅडम यांना मिळाला

अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यातील AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल हे फक्त महिलांसाठी काम करत आहे.. आतापर्यंत AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल ने गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम घेऊन महिलांना मार्केटिंग क्षेत्रात व्यवसाय मार्गदर्शन करुन त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यात येते.. व तसेच त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे.. आतापर्यंत श्रुती बत्तीन मॅडम ला अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत..

त्यामुळेच या कामाची दखल A& D फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यांनी घेतली असून सौ. श्रुती बत्तीन मॅडम ला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे..

A & D फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित  डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार सोहळा २०२५ आयोजित करण्यात आला असून देशभरातील कानाकोपऱ्या मधून सामाजिक, शैक्षणिक, शिक्षक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, उद्योग, वैद्यकीय, प्रशासकीय, पत्रकारिता (वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक/ डिजीटल मीडिया), युवक, महिला, कला, साहित्य, क्रीडा, पर्यावरण, ग्राम विकास आदी. तसेच समाजरत्न, समाजभूषण, आदर्श व्यक्तीमत्व,आदर्श ग्राम, जीवनगौरव व इतर पुरस्कार क्षेत्रांमध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या संस्था व मान्यवर व्यक्तींच्या विशेष कार्य सन्मान करून भावी वाटचालीस तसेच उल्लेखनिय कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून हा राष्ट्रीय उत्कृष्ट पुरस्कार आयोजित केला आहे.

श्रुती मॅडम ला पुरस्कार मिळाल्याबद्दल हा पुरस्कार त्यांनी त्यांच्या वडिलांना कै. मेघश्याम बत्तीन यांना समर्पित केला आहे..

सोशल मिडीया पोस्ट द्वारे अभिनंदन चा वर्षाव होत आहे..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे